उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा; भाजप नेता म्हणतो, “मजबुरीमुळे…”

| Updated on: Jul 09, 2023 | 2:46 PM

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे.

नागपूर: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. आज ते यवतमाळमध्ये आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांची मजबुरी आहे. काय करणार? कोरोनामध्ये दौरा केला असता, तर कदाचित एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आले नसते. तेव्हा काहीच केलं नाही, घरी बसले म्हणून आता दौरे करावे लावत आहे. म्हणून कधी ना कधी कष्ट करावे लागतात.आधी अभ्यास करा नंतर जीवन सुखाचं.आधी अभ्यास केला नाही तर नंतर जीवन कष्टाचं हे साधारण सूत्र असतं. हे आमच्या शिक्षकांनी सांगितलं होतं कदाचित त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं नसेल,” असं मुनगंटीवार म्हणाले.

Published on: Jul 09, 2023 02:46 PM
‘…अडीच दिवस मंत्रालयात जाण्यासाठी ज्यांना वेळ मिळाला नाही ते…’; दौऱ्यावरून ठाकरे यांच्यावर कोणी केली टीका
प्रक्षोभक पोस्टर लावणे काँग्रेस मीडिया प्रभारिला भोवलं; वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल