‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखांच्या त्या आरोपावर भाजप नेत्याचा ठाकरे यांना प्रत्युत्तर; म्हणाला, ‘मला सहानुभूती…’

| Updated on: Jul 26, 2023 | 3:09 PM

'जगदंबा' तलवार आणि वाघनखे इंग्लंडवरून परत आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. तर याबाबत पत्र व्यवहार झाल्याचं देखील ते बोलले होते.

मुंबई, 26 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांची ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे लवकरच भारतात आणणार आहोत, अशी घोषणा केली. ही ‘जगदंबा’ तलवार आणि वाघनखे इंग्लंडवरून परत आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. तर याबाबत पत्र व्यवहार झाल्याचं देखील ते बोलले होते. ते आता जनतेसमोर आणावं अशी मागणी करण्यात येत आहे. तर अशीच मागणी आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांनी त्यांच्या मुलाखतीतून देखील केली आहे. त्यावरून मुनगंटीवार यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी, ठाकरे यांच्या या मागणी बाबत सहानुभूती असून त्याबाबत दुखी असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर एका नेत्याचं पोट किती दुखावं हे मुर्तीमंत उदाहरण ठाकरे असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. तर दोन देशात होणारा पत्र व्यवहार हा राजशिष्ठाचाराचा भाग असल्याचं जर दोन वर्ष मुख्यमंत्री पद भूषविलेल्या माणसाला माहित नसतं हे दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. तर देवा या राज्याला यातून सोडवलं. त्यांना तशी माहिती हवी होती तर एक फोन करायला हवं होतं. मी स्वत: त्यांना ते पत्र दाखवलं असतं. पण जाहिर अशी पोटदुखी हे योग्य नाही असा टीका केली आहे.

Published on: Jul 26, 2023 03:09 PM
लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस, तेरणासह अनेक प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी वाढ
शिवसेनेच्या ‘त्या’ 40 आमदारांना मुदतवाढ, अपात्रतेचा मुद्दा पुन्हा लांबणीवर!