“2024 चा मुख्यमंत्री कोण हे मोदी-शाह ठरवतील”, भाजप नेत्याचा फडणीस यांच्या वक्तव्याला दुजोरा
2024 ची निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवू. कोण मुख्यमंत्री होईल हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सांगितील, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला सुधीर मुनगंटीवार यांनी दुजोरा दिला आहे.
मुंबई: कालपर्यंत 2024 मध्ये एकनाथ शिंदेच पुढचे मुख्यमंत्री असतील, असा युतीच्या नेत्यांचा सूर होता. परंतु आता 2024 च्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. 2024 ची निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवू. कोण मुख्यमंत्री होईल हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा सांगितील, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला सुधीर मुनगंटीवार यांनी दुजोरा दिला आहे. “आमच्या युतीमधले निर्णय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह घेतील. देवेंद्र फडणवीस जे बोलले ते आमच्या पक्षाचं मत आहे. 2024 ची निवडणूक आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवू,” असं मुनगंटीवार म्हणाले.
Published on: Jun 30, 2023 12:09 PM