“तो आम्हाला ज्ञान शिकवणार ?” सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून शरद पवार यांचा एकेरी उल्लेख
भाजपा नेते आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला. "भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान होत नाही", असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना केला आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नवी मुंबई : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा एकेरी उल्लेख केला. “भाजपमध्ये ओबीसींचा सन्मान होत नाही”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना केला आहे. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी नेते आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री ओबीसी आहेत का? छगन भुजबळ स्वतःला ओबीसी नेते म्हणवतात, पण सरकारमध्ये असताना अन्न आणि नागरी पुरवठा विभाग घेऊन बसले होते. त्यांना तिथे महत्त्व नाही. काँग्रेसचा पंतप्रधान कोण आहे? तर एक ब्राह्मण आहे, जो जाणवं घालतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा २२ वर्षांपासून अध्यक्ष कोण आहे? मराठा शरद पवार, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? जनतेलाही हे समजलं पाहिजे की, मायावी चेहरे घेऊन बसलेल्या या लोकांपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे. हे लोक आपल्यासमोरचा मोठा धोका आहेत, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.