Maharashtra : राज्यातील सात साखर कारखान्यांना साखर आयुक्तांची नोटीस
राज्यातील राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत सापडल्याचे पहायला मिळत आहे. आरआरसी रक्कम थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांकडून सात साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
राज्यातील राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत सापडल्याचे पहायला मिळत आहे. आरआरसी रक्कम थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांकडून सात साखर कारखान्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या साखर कारखान्यांनी तब्बल 14 लाख 50 हजार 359 रुपयांची रक्कम थकवली आहे. ज्या साखर कारखान्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे, पंकज मुंडे यांच्या साखर कारख्यान्यांसह बबनराव पाचपुते आणि कल्याणराव काळेंच्या कारखान्यांचा समावेश आहे.