कोरोना संसर्ग आणि म्युकरमायकोसिसच्या संसर्गानंतर गेल्या महिनाभरापासून आयुष्याशी झुंज देणारा डॉ. राहुल पवार याचा मृत्यू झाला. औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असताना डॉ. पवारची प्राणज्योत मालवली. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे राहुलसाठी गावकरी आणि मित्रांनी चळवळ उभारुन उपचारासाठी निधी जमवला होता. ऊसतोड कामगार कुटुंबातील तरुण जिद्दीच्या जोरावर डॉक्टर झाला होता.