काँग्रेस फूटीवर भाजप खासदाराचं मोठं विधान; म्हणाला, “काँग्रेसला संपर्काची आवश्यकता…”
शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता महाराष्ट्र काँग्रेस फूटीच्या बातम्या भाजपच्या गोट्यातून येत आहेत. काँग्रेसच्या आमदारांचा मोठा वर्ग भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे.आता यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
अहमदनगर : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता महाराष्ट्र काँग्रेस फूटीच्या बातम्या भाजपच्या गोट्यातून येत आहेत. काँग्रेसच्या आमदारांचा मोठा वर्ग भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु आहे.आता यावर भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले की, “काँग्रेसच्या कोणी संपर्कात नाही तर काँग्रेसच संपर्क करत असते. काँग्रेसला संपर्काची आवश्यकता नाही. कारण, निम्मे लोक वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याशी संपर्क करत असतात. मात्र, मी त्यांना अनेक वेळा सांगितलं की तो माझा विषय नाही. वरिष्ठांना भेटा. ते वरिष्ठ स्तरावर भेटले असतील तर त्याचे पुढे काय झालं ते मला माहित नाही. मात्र काही झालं तर टीव्हीच्या माध्यमातून कळेल. जे काही संपर्कात आहे त्यांना घेऊन काही उपयोग नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.”
Published on: Jul 10, 2023 01:06 PM