“दौरा करण्यापेक्षा घरात बसून कुणाला मुख्यमंत्री करायचं ठरवा”, भाजप खासदाराचा राष्ट्रवादीवर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच होताना दिसत आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदातून आपल्याला मुक्त करा म्हणत अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना द्यावे, अशी मागणी केली. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुजय विखे यांनी टोला लागावला आहे.
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष पदावरून रस्सीखेच होताना दिसत आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदातून आपल्याला मुक्त करा म्हणत अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्षपदावर दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्षपद ओबीसी नेत्यांना द्यावे, अशी मागणी केली. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार सुजय विखे यांनी टोला लागावला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेचा हा अंतर्गत विषय असून त्यांनी एक साथ मेळावा घेण्यापेक्षा, महाराष्ट्र दौरा करण्यापेक्षा कोण मुख्यमंत्री आणि कोण प्रदेशाध्यक्ष होणार, कोण कुठे जाणार आहे, या घरातल्या वाटण्या करून घ्या,” मग महाराष्ट्राच्या जनतेला आश्वस्त करायचं काम त्यांनी केलं पाहिजे, असा खोचक टोला सुजय विखे पाटील यांनी लगावला.
Published on: Jun 27, 2023 10:49 AM