पंकजा मुंडे यांना बीआरएसची खुली ऑफर!; सुजय विखे पाटील म्हणाले, “त्यांचा हेवा इतर…”
बीआरएस पक्षाने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सुजय विखे यांनी सूचक विधान केले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या डीएनए मध्येच भारतीय जनता पार्टी असून त्या पक्ष बदलू शकत नाही असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी दाखवला आहे.
अहमदनगर: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या डीएनए मध्येच भारतीय जनता पार्टी असून त्या पक्ष बदलू शकत नाही असा विश्वास खासदार सुजय विखे यांनी दाखवला आहे. बीआरएस पक्षाने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सुजय विखे यांनी सूचक विधान केले आहे. “आम्हाला आनंद आहे की, आमच्या नेत्या पंकजाताई यांना आम्ही अनेक वर्ष पाहिलं आहे. त्या अतिशय सक्षम नेतृत्व करू शकतात.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ही एवढी मोठी झालेली आहे आणि पंकजा मुंडेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी अजून बळकट होईल, त्यामुळे ऑफर काही पण आली तरी पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टी सोडणार नाही, असं सुजय विखे पाटील म्हणाले.
Published on: Jun 27, 2023 03:10 PM