छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही पाण्यावाचून तडफडून मेले

| Updated on: May 27, 2024 | 5:02 PM

सुखना धरणातील पाणी सुखून गेल्याने मानवाला तर फटका बसलाच आहे, शिवाय पाण्यातील जलचर देखील मेले आहेत. छत्रपती संभाजीनगरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या जनावरांना चारा देखील उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे.

Follow us on

छत्रपती संभाजी नगरातील सुखना धरण यंदाच्या तीव्र उन्हामुळे संपूर्णपणे सुखून गेले आहे. या धरणातील मृतपाणीसाठी तेवढा शिल्लक राहीला आहे. त्यातील मासे, आणि इतर जीव कसेबसे जीवन-मृत्यूशी झुंज देत आहेत. या धरणातील जलसाठ्याचे तीव्र उन्हाच्या झळांमुळे बाष्पीभवन झाले असून पाणी आटून गेले आहे. त्यामुळे धरणातील पाणी साठा संपल्याने जमीनीला एक फूटाहून अधिक लांबीच्या भेगा पडल्या आहेत. तसचे शंख शिंपले हे पाण्याअभावी मृत झाले आहेत. हजारो मृत शंख शिंपल्यांचा साठाही धरणाच्या पात्रात दिसत असून यंदाच्या दुष्काळाचे हे चित्र अत्यंत भेसूर दिसत आहे. या पाण्याच्या साठ्यावर हजारो जीव जगत असतात. त्यांना वाहत्या पाण्याबरोबर वाहता न आल्याने या शंखांचा तसचे शिंपल्यातील जीवांचा करुन अंत झाल्याने जैवविविधता ( Biodiversity Crisis ) धोक्यात आल्याचे टीव्ही 9 मराठीचे प्रतिनिधी दत्ता कनावटे यांनी घटनास्थळावरुन दिलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.