खायला एक अंड, काजू, किसमिस; वजनही 6 किलो, अन् किंमत? पहा फायटर सुल्तानची हवा

| Updated on: Jun 15, 2023 | 2:09 PM

त्यानंतर आता वाशिम जिल्ह्यातील राजा नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ज्याची किंमत 20 लाख रूपये संतोष पैठणकर या त्याच्या मालकानं ठरवली आहे. पण आता एका कोंबड्याची नागपूर जिल्ह्यात मोठी चर्चा आहे.

नागपूर : काही वर्षांपुर्वी एका रेड्याची हवा देशात चांगलीच होती. त्याच नाव सुल्तान होतं. ज्याची किंमत 21 कोटी रुपये होती. तर तो दररोज 1 लीटर पित असे आणि त्याचे वीर्य दरवर्षी 1 ते 5 कोटी रुपयांना देशभरात विकले जातं होतं. पण 2021 साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर आता वाशिम जिल्ह्यातील राजा नावाचा बोकड सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ज्याची किंमत 20 लाख रूपये संतोष पैठणकर या त्याच्या मालकानं ठरवली आहे. पण आता एका कोंबड्याची नागपूर जिल्ह्यात मोठी चर्चा आहे. फायटर सुल्तानची किंमत किती जास्तीत जास्त किती असू शकते. जादा तर 5 एक हजार. पण जर कोंबड्याची 25 हजार आहे असं कोणी म्हटलं तर पटेलं का? तर हे खरं आहे. नागपूर जिल्ह्यात फायटर सुल्तानची मोठी चर्चा आहे. हा सुल्तान कोणी व्यक्ती नव्हे तर एक कोंबडा असून, या कोंबड्याची किंमत तब्बल 25 हजार रुपये आहे. एक वर्षाच्या या सुल्तान कोंबड्याचं वजन 6 किलो आहे. सध्या या सुलतानची पंचक्रोशीत तुफान चर्चा सुरु आहे. सध्या नागपूरच्या (Nagpur) सावनेर तालुक्यात कृषी आणि पशु मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सावनेर तालुक्यातली किशोर उतखेडे यांचा हा कोंबडा बघायला परिसरातील लोक गर्दी करतात. त्याला दररोज एक अंड, काजू, किसमिस आणि बाजरी लागते.

Published on: Jun 15, 2023 02:09 PM
“हू इज अनिल बोंडे?, लायकीत राहून टीका करावी”, शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आनखी एका घोटाळ्याचा आरोप; तब्बल 150 कोटींचा टेंडर घोटाळा