सुनील कावळे यांचे बलिदान… मनोज जरांगे पाटील झाले आक्रमक, ‘आता तुमच्या…’
चोवीस तारखेनंतर मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन शांततेत करू. पण, सुनील कावळे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. हे आंदोलन आता व्यापक होईल. सुनील कावळे यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी मी जाणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज हटणार नाही.
नवी मुंबई | 19 ऑक्टोंबर 2023 : सरकारला आपण चोवीस तारीख दिली आहे. आत्महत्या करणारे सुनील कावळे यांनीही आपल्या suicide note मध्ये चोवीस तारखेचा उल्लेख केलाय. आता ही समाजाची भावना आहे आणि सरकार समजून घ्यायला तयार नाही. मराठा आरक्षण तुम्ही आता तातडीनं जाहीर करा. चोवीस तारखेनंतर आम्ही कावळे यांचे हे बलिदान वाया जाऊ देणार नाही. आंदोलन शांततेत होणार. पण, तुमच्या छाताडावर बसून आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. पण, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं बांधवाना आवाहन आहे की तुम्ही आत्महत्या करू नका. जर आमचा भाऊच नसेल बघायला तर मग त्या आरक्षणाचा उपयोग तरी काय? आत्महत्या नका करू आणि कुणाला करूही देऊ नका. पोरं जर आत्महत्या करायला लागली तर ते आरक्षण घ्यायचं कोणासाठी? आणि आम्ही लढायचं कशासाठी मग? असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Published on: Oct 19, 2023 06:28 PM