Shambhuraj Desai on Sunil Prabhu | मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाचा सुनील प्रभू यांनी विचार करावा-tv9
देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आज आढावा घेतल्याचे सांगितलं. तसेच त्यांनी इतर विषयांवर बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाचा सुनील प्रभू यांनी विचार करावा असेही म्हटलं आहे.
मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन हे 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तारात ज्यांना खाते मिळाली आहेत. त्यांनी आज मंत्रालयात जात आप आपल्या खांत्याचा मागोवा घेतला. तसाच आढावा शंभुराज देसाई यांनी मंत्रालयात जात घेतला. देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आज आढावा घेतल्याचे सांगितलं. तसेच त्यांनी इतर विषयांवर बोलताना मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणाचा सुनील प्रभू यांनी विचार करावा असेही म्हटलं आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाकडून आज संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाच्या कार्यक्रमाचे आयोजत करण्यात आला होता. मात्र ठाकरेंच्या शिवसेना मधील नेते सुनील प्रभू यांनी त्यावर बहिष्कार टाकला होता. याचबरोबर चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली होती.