“…तर संजय राऊत तुरुंगात गेले नसते”, नितेश राणे यांच्या टीकेला सुनील राऊत यांचा पलटवार; म्हणाले…
भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत सरड्यासारखे रंग बदलणारे आहेत, मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत असे नितेश राणे म्हणाले होते. यावर संजय राऊत यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी पलटवार केला आहे.
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत सरड्यासारखे रंग बदलणारे आहेत, मविआची गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत असे नितेश राणे म्हणाले होते. यावर संजय राऊत यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी पलटवार केला आहे. “संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहिती आहे की , कोणी रंग बदलले आहेत. संजय राऊत यांनी रंग बदलले असते तर ते तुरुंगात गेले नसते. महाराष्ट्र आणि देशाला माहितीय संजय राऊत किती निष्ठावंत आहेत.शिवसेना पक्ष व उद्धव ठाकरे यांच्यासाठी ज्याने रंग न बदलता तीन महिने तुरुंगात काढले त्याच्यासाठी नितेश राणे काय बोलतो याला आम्ही महत्व देत नाही”, असे सुनील राऊत म्हणाले.नितेश राणे यांनी तेजस राणे यांच्यावर केलेल्या टीकेलाही सुनील राऊत यांनी उत्तर दिलं आहे. “भारतीय जनता पार्टीने काही कुत्रे पाळलेले आहेत, शिवसेनेवरती भुकायचं हे त्यांचं काम आहे. शिवसेना ही वाघासारखी आहे, अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते.शिवसेना संघटना मजबूत आहे. उद्धवजीच नेतृत्व खंबीर आहे. येणाऱ्या काही काळात जनतेच्या कोर्टात जाऊ, त्या वेळेला महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकेल आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील”, असंही सुनील राऊत म्हणाले.