एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार, खरा मुख्यमंत्री कोण? सुनील राऊत म्हणतात, “जनता कन्फ्युज”
आमदार भरत गोगावले यांचा व्हीप सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी शिंदे गटासमोर व्हीपचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून नव्या व्हीपची निवड करण्यात आली तर तो ठाकरे गटाला व्हीप बजावणार का ? हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी भाष्य केलं आहे.
मुंबई, 16 जुलै 2016 : आमदार भरत गोगावले यांचा व्हीप सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वी शिंदे गटासमोर व्हीपचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिंदे गटाकडून नव्या व्हिपची निवड करण्यात आली तर तो ठाकरे गटाला व्हीप बजावणार का ? हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “भरत गोगावले हा बोगस व्हीप आहेत. सुनील प्रभुचा व्हीप शिवसेनेच्या 54 आमदारांना मानावा लागेल.” “तसेच सरकारच्या चहापानावर आमचा बहिष्कार असणार आहे. जनतेत मुख्यमंत्री नक्की कोण हा गोंधळ आहे. एकनाथ शिंदे , अजित पवार , देवेद्र फडणवीस तिघेही कलंक आहेत,” असं राऊत म्हणाले.
Published on: Jul 16, 2023 01:46 PM