“कोण नितेश राणे? संजय राऊतांसोबत त्यांची बरोबर होऊ शकत नाही”, सुनील राऊतांचा घणाघात
भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. यावर संजय राऊत यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी पलटवार केला आहे.
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर ट्विट करत निशाणा साधला आहे. यावर संजय राऊत यांचे भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी पलटवार केला आहे. “कोण नितेश राणे?, त्यांची आणि संजय राऊतांची तुलनाच होऊ शकत नाही. हे 10 पक्ष फिरून आलेले आहेत, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत”, असं सुनील राऊत म्हणाले. सुनील राऊत यांनी संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. “मयुर शिंदेच काय, सगळेच माझे मित्र आहेत. याचा अर्थ असा होत नाही की, हे आम्ही केलं. संपूर्ण देश संजय राऊत यांना ओळखतो. अशा धमकींना संजय राऊत घाबरत नाही”, असं सुनील राऊत म्हणाले.
Published on: Jun 16, 2023 09:18 AM