शिवसेनेच्या माजी नगरसेविकेचा संजय राऊतांच्या भावावर आरोप; सुनील राऊत म्हणतात, “ही कीड…”
ठाकरे गटाच्या नगरसेविका सुवर्णा कारंजे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे. आमदार सुनील राऊत यांनी मानसिक त्रास दिल्याने आपण शिवसेनेत गेल्याचा गंभीर आरोप सुवर्णा कारंजे यांनी केला आहे. तर कांजुरच्या शाखेतील एक कीड आमच्यातून निघून गेली , असं सुनील राऊत म्हणाले.
मुंबई : ठाकरे गटाच्या नगरसेविका सुवर्णा कारंजे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला आहे. आमदार सुनील राऊत यांनी मानसिक त्रास दिल्याने आपण शिवसेनेत गेल्याचा गंभीर आरोप सुवर्णा कारंजे यांनी केला आहे. तर कांजुरच्या शाखेतील एक कीड आमच्यातून निघून गेली , असं सुनील राऊत म्हणाले. ते म्हणाले की, “आज कांजूरमार्ग येथे अनंद्दोत्सव साजरा करण्यात येत आहे, कारण ही किड होती ती गेली. आर्थिक फायद्यासाठी सुवर्णा कारंजे शिंदेंच्या शिवसेनेत गेल्या आहेत. आरोप कोणावर होतात, जे लोकं मोठे असतात त्यांच्यावर होतात. सुवर्णा यांचे कोणाशीच पटत नव्हते. त्या तिथे गेल्याने आम्हाला काही फरक पडत नाही. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा नगरसेवक इथे मोठ्या फरकाने निवडून येईल, अशी मला खात्री आहे.”
Published on: Jun 15, 2023 12:44 PM