“शरद पवार यांच्याकडे वर्णी लावा”, शिवसेनेचा ज्येष्ठ नेता वेळोवेळी करत होता संजय राऊत यांच्याकडे विनंती”, सुनील राऊत यांचा गौप्यस्फोट
शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात पक्षाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती. संजय राऊत यांनी मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की ते राष्ट्रवादीचे आहेत की शिवसेनेचे, असं रामदास कदम म्हणाले. यावर संजय राऊत यांचा धाकटा भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात पक्षाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली होती. संजय राऊत यांनी मुलीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की ते राष्ट्रवादीचे आहेत की शिवसेनेचे, असं रामदास कदम म्हणाले. यावर संजय राऊत यांचा धाकटा भाऊ आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “रामदास कदम यांनी संजय राऊत यांना निष्ठा शिकवण्याची गरज नाही. रामदास कदम हे शिवसेनेत होते त्यावेळी ते आमच्या घरी यायचे. राऊत माझी राष्ट्रवादीत शरद पवारांकडे वर्णी लावा म्हणजे माझं बस्तान चांगलं बसेल, अशी विनवणी रामदास कदम करायचे. वेळोवेळी घेऊन त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासंदर्भात संजय राऊत यांच्याकडे विनंती केली. परंतु, संजय राऊत यांनी रामदास कदम यांना सेनेतच राहण्याचा सल्ला दिला,” असा गौप्यस्फोट सुनील राऊत यांनी केला.