Sunil Raut | ‘संजय राऊत झुकणार नाही आणि शिवसेना सोडणार नाही’
अटक झाली तरी, फासावर जरी लटकवल तरी संजय राऊत झुकणार नाही. शेवटपर्यंत उद्धव ठाकरे आणि शिवसेने सोबतच राहणार.
मुंबई : ही खोटी कारवाई आहे. उद्धव ठाकरे यांना एकट पाडण्याचा हा प्रयत्न आहे. मुलीला सुद्धा दुसऱ्या घरी नेण्यात आलं. तिची सुद्धा चौकशी झाली. पण आम्ही शिवसेना सोडणार नाही. जे पळून गेले, त्यांना हा मॅसेज आहे. संजय राऊत ईडीला घाबरून गेला नाही. अटक झाली तरी, फासावर जरी लटकवल तरी संजय राऊत झुकणार नाही. शेवटपर्यंत उद्धव ठाकरे आणि शिवसेने सोबतच राहणार, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी दिली आहे.