मनिषा कायंदे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे गटाचा आमदार म्हणाला, “त्यांच्या जाण्याने धक्का…”
शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधीच उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसले आहेत. आक्रमक महिला नेता अशी ओळख असणाऱ्या मनिषा कायंदे यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मनिषा कायंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाचे आमदार सुनिल शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधीच उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसले आहेत. आक्रमक महिला नेता अशी ओळख असणाऱ्या मनिषा कायंदे यांनी काल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मनिषा कायंदे यांच्या बंडानंतर ठाकरे गटाचे आमदार सुनिल शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मनिषा कायंदे यांच्या जाण्याने धक्का बसला नाही. यापूर्वीही अनेक आमदार गेले, तरी त्यानंतर पक्ष सावरला.राजकारणात ही प्रक्रिया सुरू असणार आहे.मनिषा कायंदे या दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत आल्या होत्या.आता परत त्या दुसऱ्या पक्षात गेल्या”, अशी प्रतिक्रिया सुनिल शिंदे यांनी दिली आहे.
Published on: Jun 19, 2023 09:55 AM