“शरद पवार यांच्याशिवाय पर्याय नाही म्हणून…” ठाकरे गटाचा अजित पवार गटाला टोला

| Updated on: Jul 10, 2023 | 1:31 PM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. पोहरादेवीच्या दर्शनाने त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मतदारसंघात काल उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

पालघर: ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. पोहरादेवीच्या दर्शनाने त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मतदारसंघात काल उद्धव ठाकरे यांनी मेळावा घेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. यावर ठाकरे गटाचे नेते सुनील शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शिवसेनेत अनेक वादळ आली. उद्धव ठाकरे या वादळाशी सामना करीत आहेत. ते कुठेही डगमगले नाहीत. विदर्भात ते शिवसैनिकांशी भेटण्यासाठी गेले आहेत.” तसेत सुनील शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीवरही प्रतिक्रिया दिली आहे. “बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे शरद पवारही आमचे दैवत आहे. शरद पवार हे राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही मोठे झालो, आज त्यांनाच दगा दिला आहे. आणि त्यांचाच फोटो वापरतात, कारण कारण त्यांच्याशिवाय त्यांना पर्याय नाही,” असं शिंदे म्हणाले.

Published on: Jul 10, 2023 01:31 PM
काँग्रेस फूटीवर भाजप खासदाराचं मोठं विधान; म्हणाला, “काँग्रेसला संपर्काची आवश्यकता…”
मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र खाते वाटप कधी? छगन भुजबळ म्हणतात, ‘चिंता करण्याचे काम नाही’