राज्यात वाद आणि खुपच काही… याचबरोबर अयोध्येत ही होणार महाराष्ट्र भवन.., यासह जाणून घ्या इतर बातम्या सुपरफास्ट 50 न्यूज मध्ये

| Updated on: Jan 05, 2023 | 3:49 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट महत्वाची ठरली. यावेळी महाराष्ट्र भवनासाठी आयोध्येत जागा देण्यास आदित्यनाथ तयार असल्याचेही समोर आले आहे.

मुंबई : राज्यात होत असलेल्या घडामोडीत आजही अजित पवार आणि राणे यांचे वार पटल वार पाहायला मिळत आहेत. काल पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी टिल्लू असा नितेश राणे यांचा उल्लेख केला होता. आमदार नितेश राणे यांनी पलटवार करत याच टिल्लूने गाम फोडला होता. तर तुम्हाला धरग्रस्त अशी उपाधी याच महाराष्ट्राने दिल्याचेही राणे म्हणाले,

तर भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना, जानता राजा फक्त एकच तेही छत्रपती शिवाजी महाराज. उगाच भावनेच्या भरात कोणालाही जानता राजा म्हणू नये असा सल्ला दिला आहे.

तर राज्याच्या दृष्टीने काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मुख्यमंत्री शिंदे यांची भेट महत्वाची ठरली. यावेळी महाराष्ट्र भवनासाठी आयोध्येत जागा देण्यास आदित्यनाथ तयार असल्याचेही समोर आले आहे.

Published on: Jan 05, 2023 03:49 PM
राजकारणाचे धंदे बंद करा, राऊतांचा योगींना इशारा
राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्ष हटवण्यासाठी अजित पवार यांच्यावर टीका