Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 1 October 2022 -TV9
शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गेल्यास त्यांच्याकडे कोणताही मास्टर प्लॅन नाही असा घनाघात निलेश राणे यांनी केला आहे.
बीकेसी मैदानावर होणारा शिंदे गटाचा दसरा मेळावा हा अभुतपूर्व होणार असल्याची प्रतिक्रीया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदेंवर आरोप केला आहे. शिंदेंनी प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी रूपये दिले आहेत. तर पैसे देऊन मेळाव्याला गर्दी जमवली जात असतल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे. तर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गेल्यास त्यांच्याकडे कोणताही मास्टर प्लॅन नाही असा घनाघात निलेश राणे यांनी केला आहे. तर सोलापुरातून शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अता अजित पवार यांच्याकडे भाषण ऐकण्याशिवाय काम नाही असे पाटील यांनी म्हटलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगली येथे चंद्रकांत पाटलांवर टीका केली. हा महाराष्ट्राची हास्य जत्रा नाही. त्यामुळे मंत्र्यानी विचार करून बोलावं असे त्या म्हणाल्या.
Published on: Oct 01, 2022 03:58 PM