दिवाळी कीट, नुकसानीचे पंचनामे यासह पहा राजकीय घडामोडी सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये
दिवाळी कीटवरून होणाऱ्या टीकेवरून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिवाळी कीट सर्व ठिकाणी पोहचवणं हे अडचणीचं असल्याचं मान्य केले आहे. तर यामुळेच अनेक ठिकाणी कीट पोहचविण्यात वेळ लागत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर सिधा पोहचविण्यासाठी रेशन यंत्रणा काम करत असल्याचेही चव्हाण यांनी म्हटलं आहे
राज्यात सर्वत्र दिवाळीचा झगमगाट पहायला मिळत आहे. सर्वत्र दिवाळीची जोरदार तयारीही केली जात आहे. याचदरम्यान भाजपकडून दीपोत्सवाचा कार्यक्रम करण्यात आला आहे. मात्र या कार्यक्रमावरून शिवसेने भाजपवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सचिन आहिर यांनी ट्वीट करत याबाबत, भाजपच्या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान झाल्याचे म्हटलं आहे. तसेच भाजपच्या या कार्यक्रमात मराठी गायक राहुल देशपांडेंना बाजूला करत बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा सत्कार केल्याचे त्यांनी म्हटलं आहे. याच दरम्यान भाजपचे आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देणाऱ्या गौरी भिडेंना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच जर त्यांना संरक्षण दिलं नाही तर भिडेंनचाही दिशा सालियान होईल असेही राणे म्हणालेत. तर दिवाळी कीटवरून होणाऱ्या टीकेवरून मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दिवाळी कीट सर्व ठिकाणी पोहचवणं हे अडचणीचं असल्याचं मान्य केले आहे. तर यामुळेच अनेक ठिकाणी कीट पोहचविण्यात वेळ लागत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर शिधा पोहचविण्यासाठी रेशन यंत्रणा काम करत असल्याचेही चव्हाण यांनी म्हटलं आहे. यादरम्यान परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे आदेश.