भू-विकास बँक, ओला दुष्काळ आणि दिवाळी कीटच्या बातम्यांसह घ्या नवे अपडेट सुपरफास्ट 50 न्यूजमध्ये
अतिवृष्टीवरून राज्य सरकारवर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसने साधला आहे. यावेळी सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी ‘भू-विकास’ बँकेतून कर्ज घेतलेलं आहे त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. शेतकऱ्यांना 964 कोटी 15 लाख रूपयांची कर्जमाफी मिळणार आहे. याबाबत आजच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय झाला. तर मनसे प्रमुख राज ठाकरे हे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसावले आहेत. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे राज ठाकरे यांनी केली आहे. तर अतिवृष्टीवरून राज्य सरकारवर निशाणा राष्ट्रवादी काँग्रेसने साधला आहे. यावेळी सरकारनं शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. तर राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेली दिवाळी कीट कोल्हापूरमध्ये पोहचली आहेत. त्यामुळे दिवाळीच्या आधी हे कीट कोल्हापूर वाशियांना मिळण्याची शक्यता आहे.