पहा दुपारच्या फटाफट सुपरफास्ट 50 न्यूज
हायकोर्टाच्या आदेशानंतर लटके यांचा राजीमाना मंजूर करण्यात आला आहे. तर लिपीकाला राजीनामा मंजूरीसाठी आयुक्तांपर्यंत जाव लागतं असं म्हणत लटकेंनी मनपा आयुक्तांवर निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकेर यांची शिवसेना ही रडकी सेना असल्याची टीका अशिष शेलार यांनी केली आहे. कधी न्यायालयात तर कधी निवडणूक आयोगाच्या समोर ते रडत असतात, असं शेलार यांनी म्हटलं आहे. तसेच ठाकरेंचा मशाल विझणारच आणि अंधेरीची पोटनिवडणूक ही आम्हीच जिंकू असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. राजीनाम्यासाठी ठाकरे गटाने न्यायालयात जाऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रय्तन केला असे शिंदे गटाच्या दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान ऋतुजा लटके यांचा वापर ठाकरे गटाकडून होत असल्याचा अरोप नितेश राणे यांनी केला आहे. तर ये अंदर की बाद है सब हमारे साथ है असेही ते म्हणाले. हायकोर्टाच्या आदेशानंतर लटके यांचा राजीमाना मंजूर करण्यात आला आहे. तर लिपीकाला राजीनामा मंजूरीसाठी आयुक्तांपर्यंत जाव लागतं असं म्हणत लटकेंनी मनपा आयुक्तांवर निशाणा साधला आहे. तर रश्मी शुक्लावरून एकनाथ खडसे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या काळात आपला 68 वेळा फोन टॅब करण्यात आला होता. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंर रश्मी शुक्ला यांना क्लिनचिट देण्यात आल्याचेही ते म्हणाले.