SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 18 June 2021

| Updated on: Jun 18, 2021 | 8:56 AM

येत्या काही तासात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या काही तासात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर याठिकाणीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसायट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे.

Kolhapur Rain | कोल्हापुरात जोरदार पाऊस, पंचगंगेची पाणीपातळी 33 फुटांवर, 59 बंधारे पाण्याखाली
Kolhapur Rain| कोल्हापुरातील धरणक्षेत्रात ‘कोसळधार’, राधानगरी धरणातून 1100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग