16 आमदार अपत्रेवर विधानसभाध्यक्षाचं मोठ वक्तव्य, म्हणाले, हा अधिकार फक्त…
यावेळी नार्वेकर यांनी, या चर्चेत अथवा बातमीमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये असं म्हटलं आहे. तर आमदार अपात्र होण किंवा न होणे हा विषय अध्यक्षांच्या निर्णयानंतरच होऊ शकतो.
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल येण्याआधीच महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी भेट घेतल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. या चर्चेला नार्वेकर उत्तर दिलं. यावेळी नार्वेकर यांनी, या चर्चेत अथवा बातमीमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये असं म्हटलं आहे. तर आमदार अपात्र होण किंवा न होणे हा विषय अध्यक्षांच्या निर्णयानंतरच होऊ शकतो. त्याला काही नियम आहेत. मात्र झटकापट आमदार निलंबित होणार किंवा होणार नाहीत याच्याबद्दल चर्चा करणंच योग्य नाही. आधी अध्यक्षांना योग्य निर्णय घ्यायचा वेळ द्या. त्यानंतर तुम्ही तुमचे तर्क वितर्क लावा असा टोला लगावला आहे. तर अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार हा संविधानाने आणि नियमांनी विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे हा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेऊ शकतात. त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. आणि कोणाला दाद मागायची असेलच तर निर्णयानंतर आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 च्या अंतर्गत कोर्टात जावू शकतात.