Bullock Cart Race : मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निर्णय; राज्यात घुमणार पुन्हा एकदा हुर्ररराची आरोळी; श्रेय वादावर भाजप आमदाराचे वक्तव्य

| Updated on: May 18, 2023 | 1:13 PM

आता राज्यातील राजकारण आनंदाबरोबरच श्रेय वादाचे वारे वाहताना दिसत आहे. यावरून भोसारीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आपली प्रतिक्रिया देताना, बैलगाडा शर्यतीतील सर्व अडथळे दूर झाल्यवरून आनंद व्यक्त केलाय.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देताना, बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आहे. राज्य सरकारचा महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा कायदा वैध ठरवण्यात आला आहे. त्यावरून आता राज्यातील राजकारण आनंदाबरोबरच श्रेय वादाचे वारे वाहताना दिसत आहे. यावरून भोसारीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी आपली प्रतिक्रिया देताना, बैलगाडा शर्यतीतील सर्व अडथळे दूर झाल्यवरून आनंद व्यक्त केलाय. तर श्रेय वादात मी पडणार नाही. मात्र बैल पळू शकतो हा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत सादर झाला असल्याचे त्यांनी सांगतिले. तसेच या सर्वांचे श्रेय त्यांचे असल्याचे लांडगे म्हणाले. राज्य सरकारने बैलगाडा शर्यतीचा कायदा नियमाला अधीन राहून तयार केलाय अन वकिलांनी ही तो सर्वोच्च न्यायालयाच्या पटलावर व्यवस्थित मांडलाय. त्यामुळं निकाल हा शर्यतीच्या बाजूनेच लागला असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे.

Published on: May 18, 2023 01:13 PM