राज्यातील सत्ता संघर्षावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात; ‘या’ मुद्द्यावर युक्तिवाद

| Updated on: Feb 15, 2023 | 11:40 AM

राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली आहे. शिंदेगटाच्या वतीने युक्तीवाद सुरु झाला आहे. या घटनेचे सर्व अपडेट तुम्ही tv9 मराठीवर पाहू शकता...

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज पुन्हा एकदा सुनावणी झाली आहे. शिंदेगटाच्या वतीने युक्तीवाद सुरु झाला आहे. अॅड हरीश साळवे यांनी शिंदे गटाची बाजू मांडत आहेत. 16 आमदारांच्या अपात्रतेवर आज युक्तीवाद केला जातोय. सर्व न्यायाधीश कोर्टात उपस्थित आहेत. काल ठाकरेगटाचा युक्तीवाद झाला आज शिंदेगटाची बाजू मांडली जातेय. 10 व्या सूचीनुसार आमदारांना अपात्र ठरण्याची मागणी ठाकरेगटाने केली आहे. त्यावर आता शिंदेगटाची बाजू हरिश साळवे मांडत आहेत. अजय चौधरी यांचं गटनेतेपद बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केलाय.

Published on: Feb 15, 2023 11:33 AM
2024 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही? रक्षा खडसे यांनी स्पष्ट भूमिका मांडली, म्हणाल्या…
शिंदेगटाच्या नेत्याविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; आंदोलनाला आव्हाडांवरील टीकेची झालर