सत्तासंघर्षाच्या निकालानंतर फडणवीस यांच्यावर सामानातून घणाघात; सोयीचा राजकीय अर्थ

| Updated on: May 12, 2023 | 4:02 PM

हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्याचा त्यात समावेश आहे. या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती.

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा विषय विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला. हा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेक निरीक्षणे नोंदवली. व्हीप, राज्यपालांची भूमिका आणि प्रतोद या मुद्द्याचा त्यात समावेश आहे. या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या या प्रतिक्रियेवरच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनातून टीका करण्यात आली आहे. यावेळी सरकार घटनाबाह्य ठरलं तर फडणवीस कालच्या निकालाचा सोयीचा राजकीय अर्थ काढत आहेत. त्यामुळे उद्या त्यांच्या वकिलीच्या डिग्रीवरही लोक संशय घेतील, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आला आहे.

Published on: May 12, 2023 09:28 AM
विधानसभा अध्यक्षांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष, आदित्य म्हणाले, आम्हाला अपेक्षा
‘त्या’ भूमिकांवर शिक्कामोर्तब; शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने आलेल्या निकालावर माधव भंडारी काय म्हणाले?