‘हेट स्पीच’ सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला खडेबोल, ‘द्वेषयुक्त भाषणामुळे…’, दिले असेही निर्देश?

| Updated on: Aug 12, 2023 | 8:00 AM

तर त्यामुळे अनेक ठिकाणी राजकारण तापले होते. तर द्वेषयुक्त भाषणामुळे हरयाणामध्ये जातीय दंगली भडकल्या होत्या. त्यानंतर आता दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2023 | मागील काही वर्षापासून देशाच्या काणोकोपऱ्यात हेट स्पीचमुळे वाद झाले आहेत. तर त्यामुळे अनेक ठिकाणी राजकारण तापले होते. तर द्वेषयुक्त भाषणामुळे हरयाणामध्ये जातीय दंगली भडकल्या होत्या. त्यानंतर आता दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने द्वेषयुक्त भाषण कोणत्याही स्थितीत मान्य करता येणार नाही असे स्पष्ट केले आहेत. तर याप्रकरणी केंद्र सरकारने एक समिती नेमवी असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत. हे निर्देश देताना, समुदायांमध्ये सलोखा आणि बंधुभाव देशासाठी महत्वाचे असल्याचेही न्यायालयाने म्हटलं आहे. हेट स्पीचबाबत पत्रकार शाहीन अब्दुल्ला यांनी याचिका दाखल केली होती. तर त्यांनी हरियाणासह देशभरात निघालेल्या रॅली, मोर्चांमधून एका विशिष्ट समाजाला टार्गेट केले जात असून त्या समाजावर आर्थिक-सामाजिक बहिष्काराचे आवाहन करणारे द्वेषयुक्त भाषण झाल्याचे या याचिकेतून न्यायालयाला सांगितले आहे. तर अशा द्वेषयुक्त भाषणांवर बंदी घालावी, त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. त्यानंतर हे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत.

Published on: Aug 12, 2023 08:00 AM
धक्कादायक! नैसर्गिक विधीसाठी गेलेली अल्पवयीन मुलगी परतली नाही, नेमकं काय घडलं? ग्रामस्थ आक्रमक
Nawab Malik bail : ‘मलिकांना जामीन मिळाला यात कसला जल्लोष?’, भाजप नेत्याचा राष्ट्रवादीला खोचक सवाल