‘आज नाहीतर उद्या अनिल देशमुख,मलिकांना न्याय मिळेल’

| Updated on: Jun 06, 2022 | 11:05 AM

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावरती अन्याय झाल्याचं सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं आहे. तसेच आमचा कोर्टावर विश्वास असून आज किंवा उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख बाहेर येतील त्यांना न्याय मिळेल अस वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावरती अन्याय झाल्याचं सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केलं आहे. तसेच आमचा कोर्टावर विश्वास असून आज किंवा उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुख बाहेर येतील त्यांना न्याय मिळेल अस वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचे दोन नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. त्यांच्यावरती अन्याय झाला आहे. त्यामुळे त्यांना कोर्ट न्याय देईल ते लवकर बाहेर येतील असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. तसेच या संपुर्ण घटनेचा आढावा राष्ट्रवादीचे छगन भूजबळ घेत आहेत असंही त्यांनी सांगितलं आहे. दोन्ही नेत्यांवरती आरोप झाल्यानंतर त्यांच्यावरती ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर त्यांना अटक केली आहे.

Published on: Jun 06, 2022 11:05 AM
अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, वडील सलीम खान यांना मिळालं पत्र
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 06 June 2022