Supriya Sule : देशात महागाई मात्र मूळ मुद्द्यापासून भरकटवण्याचा भाजपाचा प्रयत्न, सुप्रिया सुळेंची पुण्यात टीका

| Updated on: Aug 24, 2022 | 6:00 PM

देशभरात महागाईचा प्रश्न मोठा आहे. मात्र भाजपाची (BJP) मोठी खेळी आहे. लोकांना मूळ मुद्यांपासून भरकटवण्यासाठी काहीतरी वेगळेच मुद्दे काढले जात आहेत, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

पुणे : साम, दाम, दंड, भेद असे काहीही करून सत्ता मिळवणारे हे सरकार आहे. 50 खोके ऑल ओकेवाले हे सरकार आहे. हे ईडी सरकार (ED government) आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. पुण्यात एका कार्यक्रमप्रसंगी त्यांनी ही टीका केली आहे. त्या म्हणाल्या, की या सरकारची सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी सत्ता आलेली नाही. त्यांनी सत्ता ओरबाडून घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे, हे दुर्दैव आहे. देशभरात महागाईचा प्रश्न मोठा आहे. मात्र भाजपाची (BJP) मोठी खेळी आहे. लोकांना मूळ मुद्यांपासून भरकटवण्यासाठी काहीतरी वेगळेच मुद्दे काढले जात आहेत. सातत्याने लोकांना भुलवत ठेवायचे ही त्यांची पद्धत आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे.

Eknath Khadse : विचारांची लढाई विचारांनीच व्हावी, एकमेकांच्या अंगावर जाणं योग्य नाही; एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
Rahul Shewale : मुंबई सफाई कामगारांना घरं देणार, राज्य सरकारच्या निर्णयाचं राहुल शेवाळेंकडून कौतुक