आमचे राजकीय मतभेद, पण मनभेद नाहीत; सुप्रिया सुळे यांचा राऊत यांना सणसणीत प्रत्युउत्तर

| Updated on: Aug 20, 2023 | 12:45 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अजित पवार गटाचे नेते अजित पवार यांच्यावर सामनातून टीका करण्यात आली आहे. संजय राऊत यांनी रोखठोक मधून ही टीका करताना, अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या संस्थांवरून बैठक झाली. त्यांनी आता त्या संस्था सोडाव्यात असेही राऊत यांनी भूमिका मांडली होती.

पुणे | 20 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवरून सध्या वाद सुरू आहे. तर त्यांच्या पुन्हा पुन्हा बैठका होत आहेत. या बैठकावरून दैनिक सामनातून देखील आज टीका करण्यात आली. तसेच त्या बैठका या फक्त संस्थात्मक स्वरूपाच्या होत्या. त्या राजकीय नव्हत्या असे देखील सामनातून म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत. तर याच्याआधी देखील यावरून स्पष्ट केलं आहे की, आमचे राजकीय मतभेद आहेत. परंतु आमच्यात मनभेद नाही. अजितदादांवर केलेल्या अशा टीकेबद्दल मला हसू येते. हा बाळबोध आहे अशी घणाघाती टीका केली आहे. तर आम्ही नेहमी नाती जपली आहेत. आज आमची नाती ही घराबाहेर देशात अनेक ठिकाणी तयार झाली आहेत. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झाले आहे, पवार कुटुंबियांचे संस्कार आहे. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार बोलतो असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला आहे.

Published on: Aug 20, 2023 12:45 PM
‘त्यांचे ते वक्तव्य हे बाळबोध’; त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांच्याकडून राऊत यांचा समाचार
‘भाजपने कोर्टात जावं, मी वाट बघतोय’; बावनकुळे यांच्या इशाऱ्याला राऊत यांचे प्रत्युत्तर