‘त्यांचे ते वक्तव्य हे बाळबोध’; त्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांच्याकडून राऊत यांचा समाचार
शरद पवार आणि अजित पवार यांचे बिघडलेले संबंध आणि त्यांच्यात होणाऱ्या बैठकिवरून ठाकरे गटाचं मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनातून रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यावरून आता जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
पुणे | 20 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवरून सध्या वाद-विवाद होताना दिसत आहे. यावरूनच ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून टीका करण्यात आली आहे. ही टीका खासदार संजय राऊत यांनी केली असून त्यांनी, शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या. त्यात अजित पवार यांनी महत्वाच्या स्थनी बसवले. मात्र आता शरद पवार यांनाच आता ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. तर ज्या संस्था आहेत तेथे अजित पवार यांचे काय करायचे यावर बैठका होत आहेत. तर या संस्थांमधून अजित पवार यांनी बाहेर पडावे, असे राऊत यांनी रोखठोकमधून म्हटले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावरून राऊत यांचा योग्य समाचार घेताना, सुळे यांनी या सर्व संस्थांच्या काय करायचे ते आम्ही ठरवू. तर अजित पवार यांच्यावर केलेल्या अशा टीकेबद्दल मला हसू येते. हे सर्व बाळबोध असल्याचे म्हटलं आहे.