अजितदादा आणि शरद पवार यांच्या नात्यांत दुरावा? सुप्रिया सुळे म्हणातात…
एन डी पाटील आणि शरद पवार यांच्यात नाते होते. मात्र त्यांच्यात वैचारीक मतभेद देखील होते. अनेकदा एन डी पाटील यांनी शरद पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली. मात्र शरद पवार आणि त्यांच्यात कधीच दुरावा आला नाही. उलट त्यांच्यात नात्यांमधला ओलावा होता.
मुंबई : 16 ऑगस्ट 2023 | राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यातील मतभेद आता समोर आले आहेत. त्यांच्यातील मतभेदामुळेच राष्ट्रवादीत दोन गट पडले असून अजित पवार आणि शरद पवार यांचे रस्ते वेगळे झाले आहेत. तर अजित पवार हे भाजपमधील युतीत गेले आहेत. तर शरद पवार यांनी आपल्या नितीमुल्याच्या मार्गावर चालत राहणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. यावरून अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील मतभेद ताणल्याचे बोलले जात आहे. यावरून शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण देताना, आम्ही वैचारिक मतभेद आणि नात्यांमध्ये असलेला ओलावा यात कधीही फरक करत नाही. एन डी पाटील यांच्या पत्नी या पवारांच्या बहिण आहेत. मात्र तरीही एनडी पाटील अनेकदा पवारांच्या विरोधातही होते. त्यांच्यात वैचारिक मतभेदही होते. मात्र आमच्या नात्यांमधला ओलावा कधीही कमी झाला नाही. त्याच पद्धतीने अजित दादा आणि पवार साहेब यांच्यामधील नात्यांमधील ओलावा हा कुठेही कमी झालेला नाही.