हे ईडीचं सरकार असंवेदनशील, त्यांना गांभीर्य नाही; सुप्रिया सुळे यांचा घणाघात
Supriya Sule On CM Ekanath Shinde : माणसाची मृत्युची किंमत 5 लाख रुपये होते का?; सुप्रिया सुळे यांचा सवाल
पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. हे ईडीचं सरकारच असंवेदनशील आहे. अवकाळी पाऊस गारपीट याबद्दल पण या सरकारला गांभीर्य नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसंच महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात झालेल्या मृत्यूंवरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे लोक या घटनेत मृत्यूमुखी पडलेत, त्यांना श्रद्धांजली अर्पण करते. ज्यांच्या घरातले लोक गेलेत त्यांच्या प्रति संवेदना अर्पण करते. सगळ्यानी कार्यक्रम करताना संवेदनशील असावं. काल जे काही घडलं ते असंवेदनशील होतं. माणसाची मृत्युची किंमत 5 लाख रुपये होते का? हे दुर्दैवी आहे.धर्माधिकारीसाहेब यांच्याकडे पण मी गेले होते,त्यामुळे महाराष्ट्र सरकार जबाब दो, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Published on: Apr 17, 2023 03:10 PM