Video : भांड्याला भांड लागलेलं चांगलं असतं, नातं घट्ट होतं- सुप्रिया सुळे 

| Updated on: May 15, 2022 | 4:45 PM

राष्ट्रवादीने काँग्रेसच्या (congress) पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला होता. याकडे पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं लक्ष वेधलं असता सुप्रिया सुळे यांनी अत्यंत मिश्किल उत्तर दिलं. तुमचं लग्न झालं आहे का? भांड्याला भांडं लागतंच. सगळं थोडीच गुळगुळीत असतं. आमचं भांडण देखील घरातच असतं. शेवटी आपण ज्याच्याकडून अपेक्षा करतो, […]

राष्ट्रवादीने काँग्रेसच्या (congress) पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला होता. याकडे पत्रकारांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचं लक्ष वेधलं असता सुप्रिया सुळे यांनी अत्यंत मिश्किल उत्तर दिलं. तुमचं लग्न झालं आहे का? भांड्याला भांडं लागतंच. सगळं थोडीच गुळगुळीत असतं. आमचं भांडण देखील घरातच असतं. शेवटी आपण ज्याच्याकडून अपेक्षा करतो, त्याच्याशीच भांडतो. त्यांनी त्यांचं म्हणणं शरद पवार यांच्याकडे मांडलं पाहिजे. कारण त्यांच्या अपेक्षा पवार साहेबांकडूनच आहेत. सगळेजण आमच्या संसाराबाबत डाऊट घेत आहेत, असं मिश्लिक उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं. सुप्रिया सुळे या नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वादावर भाष्य केलं. तसेच हा वाद म्हणजे पेल्यातील वादळ असल्याचं भासवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. यावेळी अभिनेत्री केतकी चितळेलाही त्यांनी फटकारलं.

Published on: May 15, 2022 04:45 PM
Video : औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींचं रवीना टंडनचं समर्थन?
Thomas Cup 2022: 73 वर्षानंतर भारताने रचला इतिहास, बॅडमिंटमध्ये फायनल भारताने जिंकली