देवेंद्रजी, बोलण्यापेक्षा काम करा, जरा ‘या’ प्रश्नाकडे लक्ष द्या; सुप्रिया सुळे आक्रमक

| Updated on: Feb 14, 2023 | 3:28 PM

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. तसंच सत्तासंघर्षावरही आपलं मत मांडलं आहे. पाहा...

परभणी : देवेंद्र फडणवीसजी, फक्त बोलण्यापेक्षा काम करा. लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. पत्रकारांची हत्या होतेय. गृहखातं तुमच्याकडे आहे. जरा या गोष्टींकडे लक्ष द्या, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या गौप्यस्फोटानंतर सुप्रिया सुळे यांनी पलटवार केला आहे. “मी फडणवीस यांना सुसंस्कृत राजकारणी समजत होते. मला वाटलेलं ते डेव्हलपमेंटवर बोलतील. मात्र हे दुर्दैवी आहे की, त्यांनी असं विधान केलं. देवेंद्रजी हमे आपसे ये उम्मीद नहीं थी!, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सत्तासंघर्षावर बोलताना सत्यमेव जयते असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Published on: Feb 14, 2023 03:28 PM
देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांचा सहारा, नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
पालकांचे शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीला, काय झाली चर्चा?