Supriya Sule on ED | Anil Parab, Nawab Malik यांच्यावरील ईडी कारवाईवर सुप्रिया सुळे म्हणाल्या…
जे भाजपच्या विरोधात बोलतात त्यांनाच ईडीची नोटीस कशी जाते असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
वर्धा : देशातील विरोधी पक्षांवर केंद्रातील भाजप सरकार (BJP government) हे वचक ठेवण्यासाठी ईडीचा वापर करत आहे. तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठीही भाजपने ईडीचा (ED) ससेमिरा लावला आहे. यावरूनच सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. आणि आपण त्याचा निषेध करतो असे खा. सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी म्हटलं आहे. त्या वर्ध्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. तसेच यावेळी त्यांनी ईडीकडून अनिल परब यांना पाठवेलेल्या नोटीवरही बोट ठेवला. त्याचबरोबर अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह इतर जे आहेत. जे भाजपच्या विरोधात बोलतात त्यांनाच ईडीची नोटीस कशी जाते असा सवाल खा. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तर भाजपच्या विरोधात बोलाल तर ईडीची नोटीस येते आणि पुढेही येईल. पण तुम्ही त्यांच्या ऐकण्यात दडपशाहीत राहिला तर नोटीस नाही येणार. हा न्याय नाही अन्याय आहे.