“भाजप सत्तेत आल्यापासून वातावरण दुषित कसं होतयं?”, कोल्हापुरातील घटनेनंतर सुप्रिया सुळे यांची टीका
कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. या मोर्चात जमाव मोठ्या प्रमाणावर जमला होता. जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. यांसूपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटसवरून वाद निर्माण झाल्यानंतर आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होत मोर्चा काढला. जमाव बंदीचे आदेश झुगारुन हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. या मोर्चात जमाव मोठ्या प्रमाणावर जमला होता. जोरजोरात घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. पण आंदोलक अधिकच आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. यांसूपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “जेव्हापासून भारतीय पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहे, तेव्हापासून सारखंच असं वातावरण दुषित का होत आहे. काल नगरची घटना झाली आणि आज कोल्हापूरची घटना सुरू आहे. सारखंच तणावाचं वातावरण राज्यात कसं होत आहे. यामुळे राज्याचं नुकसान होणार आहे. कारण अशा गोष्टी होत राहिल्या, दंगली होत राहिल्या तर लोक गुंतवणूक करणार नाही. सर्वसामान्य जनता घाबरलेली आहे. त्यामुळे सध्या जे सुरू आहे हे गृहखात्याचे अपयश आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.