“निलेश राणे यांचं शरद पवारांबाबतचं वक्तव्य लज्जास्पद”, सुप्रिया सुळेंची टीका
भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी "औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार", असं खोचक ट्विट केलं. निलेश राणे यांच्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : या देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन या दोन समाजांच्या बाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान केलं होतं. या विधानावर भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली. “औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार”, असं खोचक ट्विट निलेश राणे यांनी केलं. निलेश राणे यांच्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरुन आता राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबाबत असं वक्तव्य करणं लज्जास्पद आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Published on: Jun 08, 2023 05:30 PM