अमित शहा यांनी लक्ष घालावं, संजय राऊतांना झेड प्लस सिक्युरिटी द्यावी; सुप्रिया सुळे आक्रमक

| Updated on: Apr 01, 2023 | 11:48 AM

Supriya Sule on Sanjay Raut : संजय राऊत यांना तातडीने झेड प्लस सिक्युरिटी द्यावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या आहेत? पाहा...

पुणे : ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांना झेड प्लस सिक्युरिटी तातडीने दिली पाहिजे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी यात जातीनं लक्ष घालावं. संजय राऊत हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर देशाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. हे दडपशाहीचं सरकार आहे. त्यामुळे आजकाल काय होईल, काहीच सांगता येतं नाही. मी संजय राऊतांशी लगेच बोलणार आहे. परिस्थिती जाणून घेणार आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Published on: Apr 01, 2023 11:43 AM
सगळी सुरक्षा व्यवस्था गद्दार गटाचे आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांच्यासाठी; राऊतांचा तिखट टीका
मुंब्रा बायपासवरील वाहतूक उद्यापासून बंद राहणार; पर्यायी मार्ग काय असेल? पाहा…