सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांना मुख्यमंत्रीपद द्या
माझी एकनाथ शिंदे यांना विनंती आहे. थोड्या दिवसांसाठी शिंदे यांनी आपलं मुख्यमंत्री पद अजित पवार यांना द्यावे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. एकनाथ शिंदे यांना आम्ही मोठं पद देतो. पण, असं चालत नाही, असंही सुळे यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. पण, केंद्र सरकार आपणाकडून काढून घेते, हा महाराष्ट्रावर अन्याय आहे. माझी एकनाथ शिंदे यांना विनंती आहे. थोड्या दिवसांसाठी शिंदे यांनी आपलं मुख्यमंत्री पद अजित पवार यांना द्यावे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. एकनाथ शिंदे यांना आम्ही मोठं पद देतो. पण, असं चालत नाही, असंही सुळे यांनी सांगितलं. इथं बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आहे. राज्यातील दीड लाख लोकांना संधी मिळणार होती. दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक होणार होती. हा प्रकल्प चालला असता तर राज्याला मोठा जीएसटी मिळाला असता, असंही सुळे यांनी सांगितलं.
Published on: Sep 14, 2022 06:51 PM