Video: 50 खोके घेऊन सगळं ओके करून ओरबाडून लाल दिवा आणला- सुप्रिया सुळे

Video: 50 खोके घेऊन सगळं ओके करून ओरबाडून लाल दिवा आणला- सुप्रिया सुळे

| Updated on: Sep 04, 2022 | 12:44 PM

मागच्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यांना पालकमंत्री नाही तसेच सत्ताधाऱ्यांना जनतेची सेवा करायची नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे. 50 खोके घेऊन सगळं ओके करून ओरबाडून लाल दिवा आणला अशी बोचरी टीका खासदार सुळे यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुणाच्यातरी घरीच दिसतात. मागच्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यांना पालकमंत्री नाही तसेच सत्ताधाऱ्यांना जनतेची सेवा करायची नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. साम दाम दंड भेद वापरून, सर्वकाही ओके करून हे सरकार आणले आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाले. ज्या उत्साहाने हे सरकार पाडले गेले त्या उत्साहाने कामे होताना दिसत नसल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Supriya Sule | 'सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नाही' सुप्रिया सुळेंची टीका-tv9

Published on: Sep 04, 2022 12:43 PM
VIDEO : Pune | आम आदमी पक्षाचं पुण्यावर लक्ष केंद्रीत
VIDEO : Gondia Rain | गोंदिया जिल्ह्यात पुन्हा बरसल्या पावसाच्या सरी, बळीराजा सुखावला