दादांमुळेच सुप्रिया सुळे निवडून आल्या, रुपाली चाकणकर यांनी केला दावा

| Updated on: Jan 01, 2024 | 1:27 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे दोन्ही अजितदादा पवार यांच्या मुळेच निवडून आल्याचा दावा केला आहे. तसेच जनता आता भावनिक राजकारणाला कंटाळली असून तिला विकासाचे राजकारण हवे असल्याचे म्हटले आहे. तसेच बारामतीचा निवडून येणारा खासदार महायुतीचा असेल असाही दावा चाकणकर यांनी केला आहे.

पुणे | 1 जानेवारी 2024 : भावनिक राजकारण संपले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आता विकासाचे राजकारण हवे आहे. अजित दादांवर टीका केल्या शिवाय त्यांची नावे बातम्यात येत नाहीत. काहींना तर आता दहा महिने तळ ठोकून रहावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. म्हणजे दादा होते म्हणून त्यांना काही भीती नव्हती. दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत असा दावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदार संघामधून निवडून येणारा उमेदवार महायुतीचाच असेल असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. दादा मुख्यमंत्री झाल्यास कोणाला आवडणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. कार्यकर्ते म्हणून संघटना बांधणे, दादांचा विचार तळागाळात पोहचविणे हे आमचे काम असल्याचे चाकणकर यांनी सांगितले.

Published on: Jan 01, 2024 01:27 PM