Supriya Sule On Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्या ट्विटवरून सुप्रिया सुळेंचा टोला – tv9

| Updated on: Aug 17, 2022 | 5:17 PM

मोहित कंबोज यांच्या ट्विटवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखिल टीका केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, सध्या अशा प्रकरणांमुळे देशासह राज्याची काळजी वाटतं आहे.

मुंबई : राज्यातील राजकारण हे मोहित कंबोज यांच्या ट्विटवरून चांगलेच गरम झाले आहे. त्यावरून आता सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक असा थेट सामना होताना दिसत आहे. तर कंबोज यांच्या ट्विटवरून टीकेची झोड उठलेली दिसत आहे. यादरम्यान मोहित कंबोज यांच्या ट्विटवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखिल टीका केली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, सध्या अशा प्रकरणांमुळे देशासह राज्याची काळजी वाटतं आहे. कुठतरी लिक आहे. जे चिंता वाढवणारे आहे. तर कंबोज यांच्या ट्विटवर बोलताना त्यांनी सोशल मिडीयावरून थोडाच देश चालतो अशी खोटक टीका कंबोज यांच्यावर केली आहे.

किरीट सोमय्यांजवळ आता काही उरलं नाही, म्हणून दुसऱ्या माणसाला ठेवलंय
अजित पवार आणि धनंजय मुंडेंविरोधात गद्दार नारेबाजी का केली नाही?