बारामतीतून कोण लढणार ? सुप्रिया सुळे यांनी दिले उत्तर
महाराष्ट्राचा शरद पवार यांच्यावर अजुनही विश्वास आहे. त्यामुळे त्यांना तिकीटासाठी इच्छुकांची गर्दी लागली आहे.सहा दशके पवार साहेब राजकारणात असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
त्रिप्पल इंजिनचं खोके सरकार राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यास फेल ठरले आहे. भारतीय जनता पक्षाकडून इतिहास बदलण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडत आहेत.भागवत यांनी शिवाजी महाराजांच्या समाधी संदर्भात केलेले वक्तव्य असो किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सुरत प्रकरणात केलेले वक्तव्य असो. आम्ही त्यांना हा चुकीचा इतिहास मांडू देणार नाही.जयसिंगराव पवार आणि इंद्रजित सावंत यांनी कालच या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सहा दशके आदरणीय पवार साहेबांबद्दल महाराष्ट्राबद्दल प्रेम आणि विश्वास व्यक्त केला आहे.आणि दिल्लीत अजून एक आपला हक्काचा माणूस आहे तो म्हणजे नितीन गडकरी …भले त्यांचे विचार वेगळे असतील, पक्ष वेगळा असो चांगल्याला चांगलेच म्हटले पाहीजे.बारामतीत अजून कोण लढणार हे स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीत हा मतदार संघ कोणाकडे जातो हे पाहूया असे उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांचा पक्ष आणि चिन्हं नाहीत. आमचा अजूनही सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे.कोर्टाचा निर्णय लवकर येईल अशी आम्हाला आशा आहे. वेळआली तर शेवटच्या श्वासापर्यंत लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही लढू असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहेत.