बंडानंतर पहिलं लक्ष्य जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचा नेता म्हणतो, “हे बडवे पक्षाची दिशाभूल करत आहेत…”
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांच्या बंडाळीनंतर त्यानंतर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. बंडानंतर अजित पवार गटाकडून पहिलं लक्ष्य जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना केलं आहे.
मुंबई: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांच्या बंडाळीनंतर त्यानंतर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. बंडानंतर अजित पवार गटाकडून पहिलं लक्ष्य जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले की, “आमच्या विठ्ठलाला काही बडव्यांनी घेरलेला आहे. हे बडवे पक्षाची देखील दिशाभूल करत आहेत. हेच बडवे विठ्ठलाचा निर्णय मानत नाही. पवार साहेबांनी कोणतेच कायदेशीर प्रक्रिया होणार नाही असे सांगितल्यानंतर सुद्धा यांनी कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे.”
Published on: Jul 04, 2023 09:42 AM